190 देशांचे पोलीस नीरव मोदीला शोधणार
नीरव मोदीच्या अडचणी वाढल्या
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेचे जवळपास 14000 कोटी रुपये बुडवणारा मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या अडचणी आता वाढणार आहेत. इंटरपोलने नीरव मोदी आणि त्य़ाचा भाऊ नीशल मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये सगळ्या 190 देशांच्या पोलिसांना नीरव मोदीला शोधून त्याला अटक करण्याची परवानगी मिळाली आहे.
भारताची तपास यंत्रणा CBI ने मागील महिन्यात इंटरपोलला आग्रह केला होता की, नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढावी आणि त्याचा मामा आणि गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चौकसीविरोधात देखील पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करावा.
पंजाब नॅशनल बँकने या घोटाळ्याचा खुलासा फेब्रुवारीमध्ये केला होता. पण अशी शंका आहे की, PNBने खुलासा करण्याआधीच नीरव मोदी आणि मेहूल चौकसी देश सोडून फरार झाले होते.