नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ला आणि जामा मश्जिद भागामध्ये दोन ते तीन दहशतवादी असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. हे दहशतवादी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विमान किंवा हेलिकॉप्टर हायजॅक करू शकतात, असा अहवाल आयबीनं दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लाल किल्ल्याच्या आसपास जवळपास २० हजार जवानांना तैनात करण्यात आलं आहे. यामध्ये ५०० च्या आसपास विशेष कमांडो आहेत. याचबरोबर लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये ६०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. यापैकी १०० कॅमेरे हे एचडी आहेत.


आज दुपारी १२ वाजल्यापासूनच लाल किल्ल्यावर येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच १४ ऑगस्टला संध्याकाळी ६ ते १५ ऑगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत मेट्रो स्टेशनवर पार्किंगलाही परवानगी नाही.