ब्रम्हपुत्रा नदीत बोट उलटून २ ठार, २३ जण बेपत्ता
ब्रह्मपुत्रा नदीत आज बुधवारी दुपारी बोट बुडाल्याने दोन ठार तर २३ जण बेपत्ता झाल्याची घटना घडलेय.
गुवाहाटी : ब्रह्मपुत्रा नदीत आज बुधवारी दुपारी बोट बुडाल्याने दोन ठार तर २३ जण बेपत्ता झाल्याची घटना घडलेय. जवळपास ४० प्रवासी या बोटीतून प्रवास करीत होते. दरम्यान, ११ जणांना वाचविण्यात यश आले आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, दोन जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ११ जणांना वाचविण्यात आले आहे. आसाममधील उत्तर गुवाहाटी येथे भाविकांना घेऊन जाणारी प्रवासी बोट ब्रम्हपुत्रा नदीत उलटल्याने ४० जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बोटीत मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. यामुळे बोट कलंटली व सर्व प्रवासी पाण्यात पडले.
दरम्यान, अनेक प्रवाशांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. बोट बुडाल्याचे कळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले. यावेळी ११ जणांना वाचविण्यात यश आले.