कर्नाटक : भारतात कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. सोमवारी रात्री कर्नाटकात आणखी २ कोरोनाचे रूग्ण समोर आले आहेत, आता भारतात कोरोना रूग्णांची संख्या ११६ वर गेली आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात भीतीचे वातावरण पसरले आहेत. कर्नाटकमध्ये कोरोनाचे आणखी २ रूग्ण सापडल्यामुळे आता तेथील कोरोना रूग्णांची संख्या १० वर गेली. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता सरकारने महत्त्वपूर्व निर्णय घेतले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योथील शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह, २१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता बंदची तारीख ३१ तारखे पर्यंत वाढवण्यात येवू शकते. कर्नाटकचे मंत्री बी श्रीरामुलु यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. 



'कर्नाटकात आणखी २ कोरोनाचे रूग्ण अढळले आहेत. त्यामध्ये एक २० वर्षीय तरूणी इंग्लंडमधून भारतात आली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.' अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. सोमवारी आढळलेल्या या २ रूग्णांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं आहे.  


दरम्यान, पुण्यातील कोरोना व्हायरसचा फैलाव हा दुसऱ्या टप्प्यावर आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. पुण्यातही १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. तसंच ज्या खासगी कंपन्यांना शक्य आहे त्या कंपन्यांनी कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे, आदेश देण्यात आले आहेत.