लखनऊ : मोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिल्यानंतर दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना निलंबिन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील बारांबाकी रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात असे तिकीट देण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत एएनआयने हे वृत्त दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ एप्रिल रोजी बारांबाकी रेल्वे स्थानकामधील दोन कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले तिकीट दिले होते. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सरकारी व्यासपीठावरून केंद्र सरकारची अशा प्रकारे जाहीरताबाजी करणे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.



दरम्यान, आधी या रेल्वे स्थानकात सुरुवातीला मोदींचे छायाचित्र नसलेल्या कागदाच्या रोलवर छापलेली तिकीटे प्रवाशांना दिली गेली होती. मात्र, तिकिटांचा रोड संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोदींचा फोटो असलेला रोल मशीनला लावला आणि त्यावर तिकीटे छापली आणि ती अनावधानाने प्रवाशांना देण्यात आली, असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. त दुसरीकडे यापूर्वीही आचारसंहिता लागू असताना मोदींचा फोटो असलेली रेल्वेची आणि विमानाची तिकीटे प्रवाशांना दिल्यावरुन निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या.