RS 2000 Latest Update: तुमच्याकडे अजूनही 2000 च्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 2 हजारच्या नोटेसंदर्भात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपुर्वी महत्वाचे निर्देश दिले होते. त्यानुसार अनेकांनी चलनातील 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या. पण काही लोक असेही आहेत त्यांनी नोटा बॅंकेत जमा करण्याऐवजी ई-कॉमर्स वेबसाइटवरून कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ऑर्डर केल्यावर वापरल्या.  2000 रुपयांच्या नोटा चलनात बाद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावेळी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही अमेझॉनवरून कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ऑर्डरसाठी 2 हजारची नोट देण्याचा प्रयत्न केलात तर ती स्वीकारली जाणार नाही. 2 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर असल्याचे अमेझॉनने सांगितले आहे. म्हणजेच आता तुम्ही अमेझॉनवर कोणतीही वस्तू ऑर्डर केलीत तर आता अमेझॉन तुमच्याकडून 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाही. कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या एफएक्यूमध्येही याबाबत माहिती दिली आहे.


2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर


काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉनने आपल्या वेबसाइटवर दिली होती. त्यानुसार आम्ही 2,000 रुपयांच्या नोटा स्वीकारत असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान आता देण्यात आलेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर 2023 पासून आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ऑर्डर किंवा कॅशलोडसाठी 2,000 रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे., अलीकडेच आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती.


यासोबतच रिझर्व्ह बँकेने बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती. अलीकडेच, आरबीआयने जारी केलेल्या अहवालात 2000 रुपयांच्या 93 टक्के नोटा परत आल्याचे म्हटले आहे.आरबीआय 2000 रुपयांच्या नोटा बाद करण्याची तारीख पुढे ढकलेल असे वाटत नाही. त्यामुळे ज्या नागरिकांकडे अजूनही 2 हजारच्या नोटा आहेत त्यांनी त्या दिलेल्या मुदतीच्या आत बॅंकेतून बदलून घ्यायला हव्यात, असे तज्ञांचे मत आहे.