देशातील 208 शेतकरी संघटना संसदेला घेराव घालणार
आंदोलनाला विविध पक्षांचा पाठिंबा
मुंबई : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी देशातील 208 शेतकरी संघटना संसदेला घेराव घालणार असल्याची माहिती खासदार राजु शेट्टी यांनी दिली आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत. दिडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमाफीचा कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली जाणार असल्याचे राजु शेट्टी यांनी सांगितले. या आंदोलनाला विविध पक्षांनी पाठिंबा दिला असून सर्वच पक्षांना आपली भूमिका जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनामुळे कोणते पक्ष शेतक-यांच्या बाजुने आहेत हे स्पष्ट होणार असल्याचेही राजु शेट्टी यांनी म्हटलं आहे.