२० गर्लफ्रेन्डचे चोचले पुरवण्यासाठी ‘कलाकार’ झाला दरोडेखोर!
प्रेयसीचे शौक पूर्ण करण्यासाठी एका चांगला कलाकार चोरटा बनल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली : प्रेयसीचे शौक पूर्ण करण्यासाठी एका चांगला कलाकार चोरटा बनल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी या २२ वर्षीय कलाकाराला अटक केलीये. त्याने गेल्या महिन्यात मित्रांसोबत एका पिझ्झा हट आऊटलेट दरोडा टाकला होता.
कितीचा टाकला दरोडा
अदनान खान असे या अटक करण्यात आलेल्या कलाकाराचे नाव आहे. पोलिसांनी या दरोड्याचा मास्टरमाइंड असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी अदनानने सांगितले की, त्याला मिस्टर उत्तराखंड किताब मिळाला होता आणि अनेक डान्स स्पर्धा, रिलॅलिटी शोमध्ये त्याने ऑडिशन दिले आहेत. त्याने ११ डिसेंबर २९१७ ला द्वारिका परिसरातील सेक्स्टर १२ मधील पिझ्झा आऊटलेटमध्ये तीन मित्रांसोबत चाकूच्या धाक दाखवून ३.४५ लाख रूपये पळवले होते.
गर्लफ्रेन्डचा आकड वाचून व्हाल थक्क
त्याने पोलिसांना सांगितले की, आपले महागडे शौक आणि गर्लफ्रेन्डचे खर्च पूर्ण करण्यासाठी त्याने हा दरोडा घातला. त्याला चक्क २० गर्लफ्रेन्ड होत्या. अदनान याचा याआधी गुन्ह्याचा कोणताही रेकॉर्ड नव्हता. याआधी एका आरोपी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याच माहितीवर या दरोड्याच्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे.
कशा दिसला होता हा
अदनान याला बालपणापासूनच डान्सची आवड होती. त्याने १०वी नंतर शिक्षण सोडून पूर्णवेळ डान्ससाठीच देण्याचे ठरवले. त्याला घरच्यांनी डान्स क्लास लावून दिला. त्याने ‘डान्स इंडिया डान्स’ आणि ‘झलक दिखला जा’ सारख्या लोकप्रिय डान्स शोमध्येही भाग घेतला आहे. पण कधी जिंकला नाही.
असा झाला खुलासा
इतकं करूनही त्याला तितके पैसे मिळत नव्हते की, त्यातून तो त्याचे शौक पूर्ण करू शकेल. त्यामुळेच तो काही चोरट्यांच्या गॅंगमध्ये सामिल झाला. दरोडा घातला तेव्हा सगळ्यांनी ओळख लपवण्यासाठी चेहरे झाकले होते. पोलिसांनी याप्रकरणी राम नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून इतर लोकांची नावे समजली. त्यानंतर अदनानला अटक करण्यात आली. अदनानने आपला गुन्हा कबूल केलाय.