भारतात एका कोरोना रुग्णामागे २४ जणांची तपासणी
अजून ८ आठवडे करता येतील इतक्या टेस्ट कीट उपलब्ध
नवी दिल्ली : विरोधी पक्ष सरकारवर कोरोना विषाणूची चाचणी वाढवण्यासाठी दबाव आणत आहे. कोरोनाची चाचणी वाढविण्याची मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. ते म्हणाले की कोरोनाला पराभूत करण्यासाठी चाचणींची संख्या वाढवावी लागेल आणि व्हायरसच्या पुढे जाणे आवश्यक आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आता चाचण्यांची संख्या वाढविण्यास प्रतिसाद दिला आहे.
आयसीएमआरचे वैज्ञानिक रमण गंगाखेडकर म्हणाले की, 'आम्ही एका कोरोना पॉझिटीव्ह केससाठी २४ जणांची तपासणी करीत आहोत. त्यामधील २३ जणांच्या कोरोनाची चाचणी नेगेटीव्ह आहे, परंतु तरीही आम्ही त्यांची चाचणी घेत आहोत.'
जपानमध्ये एक कोरोना रुग्णाच्या मागे ११ जणांची तपासणी, इटलीमध्ये ५ ते ७, यूएसमध्ये ५ लोकांची तपासणी होत आहे, यूकेमध्ये ३ ते ४ लोकांची तपासणी केली जात आहे. भारतात एका पॉझिटीव्ह केसमध्ये २४ चाचण्या घेतल्या जात आहेत.