नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ मंगळवारी जम्मू काश्मीरला भेट देणार आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. पीएम मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची माहिती युरोपियन युनियनच्या खासदारांना दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच एखादा आंतरराष्ट्रीय पक्ष काश्मीरला जाणार आहे. हे प्रतिनिधीमंडळ राज्यातील परिस्थितीचा आढावा घेईल. २८ सदस्यांचे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ सोमवारी एनएसए अजित डोभाल यांची भेट घेणार आहे. त्यावेळी हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे, असे सांगण्यात आले आहे.



जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० केल्यावर युरोपियन युनियननेही काश्मीरप्रश्नी भारताला समर्थन दिले होते. युरोपियन संसदेने असे म्हटले होते की, पाकिस्तान हा संशयास्पद देश आहे. काश्मीर हा मुद्दा द्विपक्षीय मामला आहे.


दरम्यान, यूरोपीय संघाचे नेते रिझार्ड झॅरॅनेकी म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारत आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादी घटनांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. राजार्ड झॅरॅनेकी यांनी पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. दहशतवादी हे चंद्रावरुन पृथ्वीवर येत नाहीत. अतिरेकी शेजारच्या देशातून भारतात येतात. या संदर्भात आपण भारताचे समर्थन केले पाहिजे, असे ते म्हणाले.