मुंबई : चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जावून पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे हजोरो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक देशांमध्ये या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. असं असताना आता भारतात ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या गंभीररित्या वाढत आहे. भारत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. यासाठी सरकारकडून उपाययोजना सुरु आहेत. पण नागरिकांनी देखील काळजी घेण्याची अधिक गरज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 292 वर पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून येत आहेत. 


कोणत्या राज्यात किती रुग्ण


महाराष्ट्र - 63
केरळ - 40  
उत्तर प्रदेश - 25
दिल्ली- 26
कर्नाटक - 18
तेलंगणा - 19
लद्दाख - 13
गुजरात - 13
पश्चिम बंगाल - 03
आंध्रप्रदेश - 03
पंजाब - 03
हिमाचल आणि ओडिशा - 02
छत्तीसगड आणि पद्दुचेरी - 01


देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आज मोठी वाढ पाहायला मिळाली. अजून दिवस संपला ही नाही. पण आकडा हा 292 पर्यंत पोहोचला आहे.


लद्दाखमध्ये कोरोनाचे 13 रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी 11 जण हे लेह आणि 2 जण हे कारगिलमध्ये आहेत.


महाराष्ट्रात आज नवे 11 रुग्ण आढळून आले. ज्यापैकी 10 जण हे मुंबईत तर 1 जण हा पुण्यातला आहे. यापैकी 8 लोकं हे विदेशातून भारतात आले आहेत. तर 3 जणांच्या यांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे.