नवी दिल्ली : तुम्हाला विमान प्रवास करायचाय? पण खर्च अधिक होत असल्याने तुम्ही करत नाहीयेत? तर मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण, देशातील ३ मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांनी विमान तिकीटावर मोठी सूट देण्यास सुरुवात केलीय.


वेबसाईट किंवा अॅपवरुन या ऑफरचा लाभ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील जेट एअरवेज, गो एअर आणि एअर एशिया या कंपन्या अनेक रुट्सवर मोठी सूट देत आहेत. संबंधित एअरलाईन्सची वेबसाईट किंवा अॅपवरुन या ऑफरचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.


ऑफर्स मर्यादित काळासाठी


गो एअर देशांतर्गेत मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी डिस्काऊंट देत आहे. या ऑफरनुसार, ९९१ रुपयांच्या सुरुवाती किमतीत तिकीट देत आहे. कंपन्यांतर्फे देण्यात येणाऱ्या या ऑफर्स मर्यादित काळासाठी असणार आहेत. गो एअर आणि जेट एअरवेज या कंपन्या स्थानिक फ्लाईट्सवर डिस्काऊंट देत आहेत. तर, एअर एशियाची ऑफर ठराविक फ्लाईट्ससाठी मर्यादित आहे. 


जेट एअरवेजचं सुरुवातीचा तिकिट दर हा ११७० रुपयांपासून सुरु होत आहे. एअर एशिया परदेशात जाण्यासाठी कमीत कमी १९९९ रुपये तिकिट घेत आहे.


या रुट्सवर आहे गो एअरची ऑफर


गो एअरची ही ऑफर काही ठराविक रुट्सवर आहे. गो एअरची अधिकृत वेबसाईट goair.in नुसार, या ऑफरचा लाभ घेण्याची अंतिम तारीख २० मार्च २०१८ आहे. गो एअरने काही ठराविक रुट्ससाठी ही ऑफर सादर केली आहे. जर तुम्ही एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा फ्लाईटचं तिकिट बूक केलं तर तुम्हाला १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.


कुठल्या रुटवर किती आहे तिकिट


  • बागडोगरा-गुवाहाटी भाडं ९९१ रुपये


  • चेन्नई-कोच्ची भाडं ११२० रुपये


  • गुवाहाटी-बागडोगरा भाडं १२९१ रुपये


  • बंगळुरु-कोच्ची भाडं १३९० रुपये


  • चेन्नई-कोच्ची भाडं ११२० रुपये


  • लखनऊ-दिल्ली भाडं १२०५ रुपये


  • दिल्ली-लखनऊ भाडं १२९४ रुपये


  • चंडीगढ़-दिल्ली भाडं १२५४ रुपये


या व्यतिरिक्त असेही काही रुट्स आहेत ज्या ठिकाणी ऑफर्स लागू आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही गो एअरच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.


जेट एअरवेजची ऑफर


जेट एअरवेजने देशांतर्गत रुट्सवर ११७० रुपयांच्या सुरुवाती तिकिट दराने प्रवास करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. काही ठराविक रुट्सवर मात्र, ११७० रुपयांत सहजरित्या विमान उड्डाण करण्याचा आनंद घेता येऊ शकतो. मात्र, जेट एअरवेजची ही ऑफर काही ठराविक रुट्ससाठी आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी २५ मार्च २०१८ पर्यंत बूकिंग करु शकता.


कुठल्या रुटवर मिळणार ऑफरचा फायदा


  • बागडोगरा-गुवाहाटी भाडं ११७० रुपये


  • गुवाहाटी-बागडोगरा भाडं १५२७ रुपये


  • इंफाळ-गुवाहाटी भाडं १७०० रुपये


  • गुवाहाटी-इंफाळ भाडं २०५७ रुपये


  • बंगळुरु से इंदूर भाडं २६०१ रुपये


  • इंफाळ-कोलकाता भाडं ३१७० रुपये


एअर एशियाची ऑफर


एअर एशियाची ही ऑफर आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवर मिळणार आहे. ठराविक रुट्सवर १९९९ रुपयांत (सर्व करांसह) तिकिट देत आहेत. मात्र, हा प्रवास २ डिसेंबर २०१८ पूर्वी करणं आवश्यक आहे. कंपनीच्या या ऑफरमध्ये भुवनेश्वर ते क्वालालांपूर, लँगकॉवी, बाली, सिंगापुर या रुट्सचा समावेश आहे.