निपाह व्हायरसमुळे या 3 फळांवर आणि भाज्यांवर बंदी
पाहा कोणत्या फळांवर घातली आहे बंदी
मुंबई : केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका वाढतच चालला आहे. भारतात देखील हळूहळू तो पसरत आहे. निपाह व्हायरसमुळे आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमधून येणाऱ्या फळ आणि भाज्यांवर आता बंदी घालण्यात आली आहे. भारतातून एक्सपोर्ट होणाऱ्या वस्तूंवर देखील परदेशातून बंदी टाकली जावू शकते. WHO चा दावा आहे की, हा व्हायरस वटवाघुळाची लाळ, यूरीन मलमूत्र यामधून पसरतो. वटवाघुळाने खालेल्ली फळं देखील या रोगासाठी कारणीभूत ठरत आहेत. इतर देशांमध्ये देखील याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या फळांवर बंदी
केरळच्या स्थानिक वृत्तपत्रांच्या बातमीनुसार निपाह व्हायरसमुळे यूएई आणि बेहरीनने केरळमधून एक्सपोर्ट होणारे फळ आणि भाज्यांवर बंदी घातली आहे. दोन्ही देशांनी केंद्र सरकारला याबाबत सूचना दिली आहे. आंबा, द्राक्ष ही फळं देखील बॅन करण्यात आली आहेत.
किती होतं निर्यात
अॅग्रीकल्चर आणि प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेवलपमेंट अथॉरिटी (APEDA)च्या माहितीनुसार मागच्या वर्षी भारताने एकूण 4448.08 कोटींची फळं एक्सपोर्ट केली होती. यामध्ये आंबा, द्राक्ष, केळी आणि डाळींब या फळांचा समावेश आहे. भारत सर्वाधिक केळी निर्यात करतो. भारतात 26.04% टक्के कळीचं उत्पादन होतं. 44.51% टक्के पपई आणि 40.75% टक्के आंबा उत्पादन होतं. कॉर्मस मिनिस्ट्री रीता तेवतियाच्या मते मागच्या वर्षी भारतातून 52761 टन आंबा निर्यात झाला.
कोठे होतं निर्यात
APEDA च्या मते भारतातून यूएई, बांगलादेश, मलेशिया, नेदरलँड, श्रीलंका, नेपाळ, यूके, सऊदी अरब, पाकिस्तान आणि कतार या देशांमध्ये निर्यात होते.
तिसऱ्यांदा भारतात आला निपाह
केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची घटना भारतात पहिल्यांदाच घडलेली नाही. 2 वेळा पश्चिम बंगालमध्ये देखील निपाह व्हायरसचा धुमाकूळ होता. 2001 मध्ये सिलिगुडीमध्ये निपाह व्हायरसचा धोका निर्माण झाला होता. 2007 मध्ये नादियामध्ये निपाह व्हायरसचा धोका निर्माण झाला होता. आता निपाह व्हायरस दक्षिण राज्यामध्ये पोहोचला आहे. कोझीकोडमध्ये एकाच कुटुंबामध्ये हा आढळला.
टॉप 5 फळं जी होतात एक्सपोर्ट
काजू : 856.85 मिलियन डॉलर म्हणजे 5700 कोटी रुपये
द्राक्ष : 230.7 मिलियन डॉलर म्हणजे 1534.78 कोटी रुपये
आंबा : 163.22 मिलियन डॉलर म्हणजे 1085.86 कोटी रुपये
नारळ : 78.54 मिलियन डॉलर म्हणजे 522.50 कोटी रुपये
डाळींब : 76.36 मिलियन डॉलर म्हणजे 508 कोटी रुपये
एकूण निर्यात : 1610 मिलियन डॉलर म्हणजच 10710 कोटी रुपये.