मुंबई : पैशांची अचानक गरज लागली तर व्याजावर पैसे घेण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी किती टक्के व्याजवर पैसे मिळत आहे हे देखील व्यक्ती पाहत नाही. कारण तेव्हा त्याला पैशांचा अधिक गरज असते. पर्सनल लोन घेण्यासाठी कोणतीही वस्तू गॅरेंटी म्हणून ठेवली जात नाही. पण त्याऐवजी अधिक टक्के व्याज घेतलं जातं. पर्सनल लोन देण्याआधी कंपनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड आणि कर्ज फेडण्याची क्षमता तपासते. पण थोडा वेगळा विचार केला तर पर्सनल लोनला देखील पर्याय मिळू शकतो आणि तुमचे व्याजावर जाणारे अधिक पैसे देखील वाचू शकतात.


विमा पॉलिसीवर कर्ज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्सनल लोन पेक्षा विमा लोन अधिक स्वस्त असतं. तुम्ही जर जीवन विमा पॉलिसी काढली असेल तर त्यावर लोन घ्या. विमा पॉलिसीवर तुम्ही हे लोन मिळवू शकतात. बँकांपेक्षा निश्चितच ते तुम्हाला कमी व्याजदरात मिळतं.


पीएफमधून काढू शकता पैसे


जर तुम्ही नोकरी करत आहात आणि तुम्हाला कधी अचानक पैशांची गरज पडली तर तुम्ही तुमचा पीएफ काढू शकता. पण तुम्ही सगळे पैसे नाही काढू शकत. पण यासाठी तुमचं पीएफ अकाउंट ५ वर्षापेक्षा जुनं असलं पाहिजे. ५ वर्षानंतर ५० टक्के रक्कम तुम्ही काढू शकता.


सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज 


भारतीय लोकांना सोन्याचे दागिने करण्याची सवय आहे. घरातील महिलांचं याकडे कल अधिक असतो. पैशांची अचानक गरज पडली तर सोन्यावर कर्ज घेऊ शकता. गैर-बँकींग संस्था (NBFC) या शिवाय इतर बँक गोल्ड लोन देतात. याचं व्याज दर पर्सनल व्याजदराच्या तुलनेत कमी असतं.