नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये उडालेल्या चकमकीत भारतीय लष्करानं ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. शोपियनमधल्या वाची इथे ही चकमक झाली. अदिल शेख आणि वसिम वणी अशी मृत दहशतवाद्यांची नावं आहेत. हे दोघेही शोपियनचे रहिवासी होते. तर तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. हे तिघेही हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेशी जोडलेले होते. यापैकी अदिल शेख यानं २०१८ मध्ये श्रीनगरमधले पीडीपीचे तत्कालीन आमदार एजाझ मिर यांच्याकडच्या ८ रायफली लुटल्या होत्या.