मुंबई : देशातील १० राज्यातील ३० शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही गोष्ट देशासाठी एक आव्हान आहे. या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ८०% कोरोना संक्रमणाच्या बाबती या ३० शहरांचा परिणाम सर्वाधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित शहरांबाबत अधिकाऱ्यांसोबत शनिवारी आरोग्य सेक्रेटरींनी बैठक घेतली. या बैठकीत संक्रमण रोखण्याबाबत महत्वाची विस्तृत अशी चर्चा झाली. या बैठकीत आरोग्य सेक्रेटरी प्रीती सुदन यांच्यासह ३० शहरांचे कमिश्नर, जिल्हा कलेक्टर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी देखील होते. 


देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधित ३० शहरांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंधप्रदेश, गुजरात आणि उडीसा यांचा समावेश आहे. या शहरातील कंटेनमेंट झोनमधील डबलिंग रेट कसा रोखता येईल यावर चर्चा करण्यात आली. 


तसेच यामध्ये अशी माहिती मिळाली की, या भागात दाटीवाटीची लोकवस्ती असून आरोग्य सुविधा मर्यादित आहे. सोशल डिस्टन्शिंग पाळलं जात नाही. महिलांसमोर अनेक समस्या आहेत. 


देशभरात आतापर्यंत ३०,१५० रूग्ण ठणठणीत बरे झाले आहे. गेल्या २४ तासांत २,३३३ रूग्ण बरे झाले आहेत. एका दिवसांत बरं होणाऱ्या रूग्णांचा आकडा वाढला आहे. देशात एकूण ८५,९४० रूग्ण आढळले असून २४ तासांत ३,९७० रूग्ण समोर आले आहेत.   


१६०६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज एका दिवसांत ६७  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ११३५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ५२४ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ हजार ८८  रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३० हजार ७०६ इतकी झाली आहे.