नवी दिल्ली : दिल्लीत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात डेंग्यूचे कमीत कमी ८९४ रुग्ण आढळून आले. तर या आठवड्यात ही संख्या वाढून ३,१०९ इतकी झाली आहे. नगर निगमने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती मिळत आहे. २३ सप्टेंबरपर्यंत देशाच्या राजधानीत मलेरिया आणि चिकनगुनियाचे अनुक्रमे ९५४ आणि ५३३ रुग्ण आढळून आले. 


१६ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे २,२१५ रुग्ण असल्याचे समोर आले होते. त्यानंतर एका आठवड्यात या संख्येत ४०% वाढ झाली आहे. या ३,१०९ रुग्णांपैकी १,४६५ लोक हे दिल्लीचे रहिवासी आहेत तर बाकी इतर राज्यातील रुग्ण आहेत. दिल्लीतील स्थानिक १,४६५ रुग्णांपैकी ७६१ रुग्ण या महिन्यात समोर आले आहेत. डेंग्यूच्या या वाढत्या प्रभावामुळे आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.