नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये सुरक्षा रक्षकांनी आणखी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. आतापर्यंत चार दहशतवादी मारले गेले आहेत. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे असल्याचं बोललं जातंय. सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरु आहे. याआधी रविवारी सुरक्षा रक्षकांनी तीन अतिरेक्यांना ठार केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी आधीच्या उरीच्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत होते. पण जवानांनी हल्लाची शक्यता उधळून लावली. शनिवारी रात्री उरीच्या कल्लाह्या गावात ही चकमक सुरू झाली. रविवारी सुरक्षादलाने तीन दहशतवाद्यांना ठार केले.


कलगही गावात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनी तीन अतिरेक्यांना ठार केलं.