आगीचा गोळा... सूर्याच्या अगदी जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही? भारतीय वैज्ञानिकांचे भन्नाट तंत्रज्ञान

आदित्य-L1 ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम आहे.

Jul 03, 2024, 20:44 PM IST

Aditya L1:  भारताच्या अदित्य आदित्य L1 मोहिमेने अत्यंत महत्वाचा टप्पा गाठला आहे. 178 दिवसांत Aditya-L1 ने पहिली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण केली आहे. 2 जुलै 2024 रोजी Aditya-L1 या तिसऱ्या कक्षेत पोहचले. 6 जानेवारी 2024 रोजी या यानाने टार्गेट पाईंटच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे. सूर्याच्या जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही?  काय आहे यामागचे तंत्रज्ञान जाऊन घेवूया.

1/7

 सूर्य हा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे.  सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या  L-1 पॉइंटजवळ हे यान पोहचणार आहे.

2/7

 आदित्य L1 वर सूर्यकिरणांचा प्रभाव रोखण्यासाठी, रेडिएटर्स आणि उष्णता पाईप्स बसविण्यात आले आहेत. आदित्य एल1 चे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यात सन शील्ड बसवण्यात आले आहे. यामुळे सूर्याकडून येणारी किरणे थेट यानावर पडणार नाहीत. 

3/7

सूर्याच्या तीव्र उष्णतेपासून आदित्य L1 चे संरक्षण करण्यासाठी यात अतिरिक्त थर्मल सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. आदित्य L1 ची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की 500 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान देखील त्याला हानी पोहोचवू शकत नाही.

4/7

सूर्याच्या गर्भाचे तापमान 15 लाख अंश सेल्सिअस आहे. तर, बाहेरून सूर्य 10,000 अंश सेल्सिअस इतका उष्ण आहे. सूर्याच्या गर्भाचे तापमान 15 लाख अंश सेल्सिअस आहे. तर बाहेरून सूर्य 10,000 अंश सेल्सिअस इतका उष्ण आहे. पृथ्वीचा गाभा ज्याला इंग्रजीत कोअर ऑफ द अर्थ म्हटले जाते, त्याचे तापमान 5 हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते.

5/7

 L-1 कक्षेत सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत हे यान पोहचवणे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.  सूर्याच्या जवळ जाऊनही आदित्य L1 यानाचे काहीच नुकसान होणार नाही. 

6/7

 L1 पॉइंटजवळ एका ठराविक बिंदूवर सूर्य आणि पृथ्वी दोन्ही ग्रहगोलांची बलं समसमान होतात. येथे असलेली वस्तू कुणा एकाच्या बाजूनं खेचली न जाता मध्ये बॅलन्स राहते तेथे हे यान पोहचणार आहे. 

7/7

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानच्या अंतरापेक्षा जळपास चौपट अंतर पार करुन हे यान सूर्याच्या जवळ जाणार आहे.