Union Budget 2024: करदात्यांना 100000 पर्यंतची सूट? सर्वसामान्यांना बजेटमधून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

एनडीए सरकार नव्या करप्रणाली अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवून 50 हजारांऐवजी 1 लाख करण्याचा विचार करत आहे.   

Jul 03, 2024, 20:11 PM IST

एनडीए सरकार नव्या करप्रणाली अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवून 50 हजारांऐवजी 1 लाख करण्याचा विचार करत आहे. 

 

1/9

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्प 2024 साठी तयारी सुरु केली आहे.   

2/9

त्याचसह लोकांना अर्थ मंत्रालयाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हेदेखील समोर येऊ लागलं आहे. करदात्यांना टॅक्स बेनिफिटची अपेक्षा आहे.   

3/9

बजेटसंबंधी ज्या अपेक्षा आहेत, त्यात स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवल्या जाण्याचाही सहभाग आहे.   

4/9

अनेक रिपोर्ट्सनुसार, केंद्रातील एनडीए सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.   

5/9

यानुसार, एनडीए सरकार नव्या करप्रणाली अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवून 50 हजारांऐवजी 1 लाख करण्याचा विचार करत आहे.   

6/9

देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झालं आहे. अशात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा होऊ शकतात.   

7/9

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मध्यमवर्गीयांना करातून सूट देण्यासाठी मोठी घोषणा करु शकतात.   

8/9

2023 मध्ये निर्मला सीतारमण यांनी नव्या करप्रणाली अंतर्गत 50 हजारांपर्यंतच्या स्टँडर्ड डिडक्शनची घोषणा केली होती.   

9/9

याआधी 2018 मध्ये दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकरदार वर्गाला दिलासा देण्यासाठी 40 हजारांच्या स्टँडर्ड डिडक्शनची घोषणा केली होती.