मुंबई : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून सोमवारी पहाटेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या एक लाख 38 हजारांवर पोहोचली आहे. परंतु, या सर्वांमध्ये देशातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे, ही एक दिलासाची बातमी आहे. आतापर्यंत देशात सुमारे चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार,


• एकूण रुग्ण 138845


• रुग्णालयाद दाखल 77103


• बरे झालेले रुग्ण 57720


• मृत्यू - 4021


म्हणजेच, देशात कोरोनावर मात करून बरे झालेल्या लोकांची संख्या सतत वाढत आहे आणि आता ती 60 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी देशातील चाळीस टक्केपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. सोमवारी पहाटेपर्यंत देशात बरे होणाऱ्यांची संख्या 41.28% आहे.


जर आपण देशातील पहिल्या पाच सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले्या राज्यांविषयी चर्चा केली तर इथेही रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  गेल्या काही दिवसांत, देशात दररोज 2500 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर मात करत आहेत.


पहिल्या 5 राज्यातील संख्या


महाराष्ट्र: 14600 रुग्ण


तामिळनाडू: 8324 रुग्ण


दिल्लीः 6540 रुग्ण


गुजरात: 6412 रुग्ण


राजस्थानः 3848 रुग्ण 


या पाच पाच राज्यांव्यतिरिक्त केरळ, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांतही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे देशात अशी अनेक रुग्ण समोर आले आहेत ज्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत किंवा काही प्रमाणात लक्षणे आढळले आहेत. अशा परिस्थितीत काही दिवस उपचार व काळजी घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बरी होत असल्याचे दिसते, जे देशासाठी दिलासा देणारी बातमी आहे.


जगाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारत सध्या रिकव्हरीच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावर आहे. परंतु, अशा देशांमध्येही भारताचा समावेश आहे जेथे रूग्णांचा वेग झपाट्याने वाढत आहे.