काश्मीर : भारतीय वायुसेनेनं मंगळवारी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोट भागात केलेल्या हल्ल्यात 'जैश ए मोहम्मद' या दशतवादी संघटनेच्या ४२ प्रशिक्षित 'सुसाईड बॉम्बर्स'चा खात्मा झाल्याची माहिती मिळतेय. या दहशतवाद्यांनी जैश ए मोहम्मदच्या याच बालाकोट भागातील कॅम्पमध्ये दहशतवाचं ट्रेनिंग घेतलं होतं. गुप्तचर विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, यातील अनेक सुसाईड बॉम्बर्स 'लॉन्च पॅड'वर भारतात घुसून दहशतवादी कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालाकोटमधील 'सईद अहमद सहीद ट्रेनिंग कॅम्प' जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचा मेव्हणा मौलाना युसूफ अझहर उर्फ उस्ताद गौरी हा चालवत होता. याच दहशतवादी कॅम्पला भारतीय वायुसेनेकडून मंगळवारी पहाटे ३.४५ ते ३.५३ वाजल्याच्या दरम्यान 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी लक्ष्य केलं. या एअरस्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचे कमीत कमी तीन कंट्रोल रुम उद्ध्वस्त केले. 


या हल्ल्यात ठार झालेल्या 'जैश ए मोहम्मद'च्या ४२ प्रशिक्षित 'सुसाईड बॉम्बर्स'ची यादीच झी मीडियाच्या हाती लागलीय. 




 


यातील १४ जण रावळपिंडीशी संबंधित आहेत. उल्लेखनीय म्हणजे, जैशचा म्होरक्या मसूज अहजर हा रावळपिंडीचा आहे. सध्याही त्यानं रावळपिंडीच्या एका मिलिटरी हॉस्पीटलमध्ये आश्रय घेतला असल्याची माहिती हाती येतेय. 


 



 


बालाकोटचा हा कॅम्प जैशसोबतच आणखी एक दहशवादी संघटना 'हिझाब - उल - मुजाहिद्दीन'कडूनही दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात होता. या दहशतवादी कॅम्पला अझहर आणि इतर दहशतवाद्यांकडून भेटी दिल्या जात होत्या... तसंच नवशिक्या भटकलेल्या तरुणांना दहशतवादाचं प्रशिक्षण देण्याचंही काम त्यांच्याकडून इथेच सुरू होतं. 


 



 


भारतीय वायुसेनेनं हल्ला केला तेव्हा या दशतवादी कॅम्पमध्ये कमीत कमी ३०० दहशतवादी उपस्थित होते, अशीही माहिती मिळतेय. तरुणांना दहशतवादाचं प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांमध्ये अनेक जण माजी पाकिस्तानी सेनेचे अधिकारी होते, अशीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.