नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 67 हजारांवर पोहचला आहे. भारतात गेल्या 24 तासांत 4213 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67 हजार 152 झाली आहे. गेल्या 24 तासात 97 जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात 20 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 2206 जणांचा मृत्यू झाला आहे. 


कोरोना रुग्णांचा संख्या दिवसागणिक वाढत असताना, दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट वाढून तो 31.1 टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.



लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मे रोजी सुधारित डिस्चार्ज पॉलिसीची घोषणा करण्यात आली. आता डिस्चार्ज देण्यापूर्वी चाचणी करण्याची आवश्यकता नाही. डिस्चार्जनंतर रुग्णाला 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणं बंधनकारक आहे. ही डिस्चार्ज पॉलिसी अनेक देशांच्या अभ्यासातून करण्यात आली आहे. अभ्यासानुसार डिस्चार्ज पॉलिसीमध्ये बदल करण्यात आले आहेत. 



दरम्यान, 23 विमानांद्वारे वंदे भारत मिशन अंतर्गत चार हजार भारतीयांना परत आणण्यात आलं असल्याचं गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. कॅबिनेट सचिवांनी सर्व प्रमुख सचिवांसह बैठक घेतली असून त्यात मजूरांना रेल्वे रुळांवरुन न जाण्याबाबत सांगण्यात आलं आहे. 



 


रेल्वेचे संकेतस्थळ क्रॅश;ऑनलाईन बुकिंगचे तीनतेरा


रेल्वेकडून 12 मेपासून टप्प्या-टप्प्याने ट्रेन चालवण्यात येणार आहे. तिकीट कन्फर्म असल्यास प्रवासी प्लॅटफॉर्मवर येऊ शकतो. ई-तिकीट असल्यास कोणत्याही पासची आवश्यकता नाही.


जेवण आणि पाणी घरुनच आणा; रेल्वेच्या प्रवाशांना सूचना