मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ५ वर्षांची शिक्षा
मणिपूरच्या एका ट्रॉयल कोर्टाने सोमवारी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा मुलगा अजय मिताईला रोड रेज प्रकरणात ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
नवी दिल्ली : मणिपूरच्या एका ट्रॉयल कोर्टाने सोमवारी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा मुलगा अजय मिताईला रोड रेज प्रकरणात ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रोड रेज हे २०११ चं प्रकरण आहे. २० मार्च २०११ ला झालेल्या रोडरेज प्रकरणात रोजरवर गोळी झाडल्याबद्दल भारतीय कलम ३०४ च्या नुसार अजय मिताईला ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रोजरने मिताईच्या गाडीला त्यांच्या एसयूवीच्या गाडी पुढे नाही जाऊ दिलं. यामुळे मिताईला या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी रोजरवर गोली झाडली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. एन बीरेन सिंह यांनी १५ मार्चला मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.