58 Year Old Mother In law Gives Birth To Baby:  कौटुंबिक वादविवाद न्यायालयात अलीकडेच एक अजीब प्रकार समोर आला आहे. एका विधवा सुनेने सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत हिस्सा मागितला होता. मात्र, सासू-सासऱ्यांनी हिस्सा देण्यास नकार दिला. अखेर संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यावेळी सुनेने सासू-सासऱ्यांवर केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. सुनेचा संपत्तीवरील हक्क डावलण्यासाठी सासू-सासऱ्यांनी वयाच्या ५८व्या वर्षी बाळाला जन्म दिल्याचा आरोप सुनेने केला आहे. 


संपत्तीसाठी कोर्टात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनेने सासू-सासऱ्यांवर केलेल्या आरोपांत म्हटलं आहे की, सासू-सासऱ्यांनी संपत्तीचे विभाजन करण्यास नकार दिला आहे. सासू-सासरे मला संपत्तीमध्ये हिस्सा देत नाहीयेत, असा आरोप सुनेने केले आहेत. सासू-सासऱ्यांनीही सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कुठलाही समझौता झाला नसून कोर्टाने दोघांनाही सुनावणीसाठी पुढील तारीख दिली आहे. 


दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन


आग्रा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत तरुणीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिच्या नवऱ्याची जिम  होती तसंच तो त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर पत्नी तिच्या माहेरी राहू लागली. त्यानंतर तिने सासु-सासऱ्यांकडे संपत्तींमध्ये हिस्सा मागितला होता. मात्र, ते तिला हिस्सा देण्यास टाळाटाळ करत होते. त्यानंतर ५ महिन्यांपूर्वी तिला कळले की तिच्या सासूने ५८व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. त्यावेळेस तिने संपत्तीसाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. 


५८व्या वर्षी मुलाला जन्म


तरुणीने केलेल्या आरोपांनुसार, तिला सासु-सासऱ्यांच्या संपत्तीत हिस्सा हवा होता. त्यामुळंच तिच्या सासू-सासऱ्यांनी ५८व्या वर्षी मुलं जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संपत्तीला वारस हवा म्हणून त्यांनी मुलाला जन्म दिला. आता ते पूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर करण्याचा विचार करत आहे. सुनेने केलेल्या आरोपांमुळं हे प्रकरण चर्चेत आलं आहे. 


पुर्वजांच्या घरात राहण्यास केली होती जबरदस्ती


कुटुंब समुपदेशन केंद्रात समुपदेशासाठी आलेल्या सासऱ्यांनीही सुनेवर आरोप केले आहेत. आम्ही सुनेला गावात असलेल्या घरी राहायला सांगितलं होतं. मात्र ती तिथे राहण्यास तयार नव्हती. गावातच आमच्या पूर्वजांची संपत्ती आहे, असं सासऱ्यांनी म्हटलं आहे. यावर सुनेनेदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. सासू-सासरे मला गावात राहण्याची जबरदस्ती करतात. मात्र तिथे पक्के घरदेखील नाही. मी तिथे कशी राहु शकते. जर ते मला पक्क घर बांधून देण्यास तयार असतील तर मी पुर्वजांच्या घरात राहण्यास तयार आहे, असं सुनेने म्हटलं आहे.