मुरादाबाद : उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये सहा महिन्यांची चिमुरडी बेवारस अवस्थेत कचऱ्याच्या ढिगात सापडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजही मुलींना ओझं समजणाऱ्यांची देशात कमतरता नाही. मुरादाबादच्या जनपदच्या कुंदरकी स्टेशन क्षेत्राच्या भिकनपूर कुलवाडा गावात पोलिसांना ही चिमुरडी कचऱ्याच्या ढिगात आढळली. 


या चिमुरडीला तिचे आई-वडील रस्त्याच्या कडेला टाकून फरार झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय.


कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काही तरुण ग्रामस्थांना मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. या तरुणांनी मुलीला कचऱ्याच्या ढिगातून उचलून गावातील इतरांना याबद्दल कळवलं. ग्रामस्थांनी याबद्दल ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. 


उपचारासाठी पोलिसांनी या मुलीला रुग्णालयात दाखल केलं. या मुलीचे आई-वडील कोण आहेत? तिला असं का टाकण्यात आलं? याबद्दल पोलीस चौकशी करत आहेत. तोपर्यंत बेवारस अवस्थेत आढळलेल्या या मुलीला चाइल्ड लाईन पाठवण्याची तयारी करण्यात येतेय.