नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनच्या पहिल्या दिवशी दिल्लीच्या खान मार्केटमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे देण्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएस तुगलक रस्त्यावर रात्री जवळपास 1च्या सुमारास खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ हा प्रकार समोर आला. त्यानंतर दिल्ली पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या या घटने प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. रविवारी खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ काही व्यक्ती बाईकवर स्वार होते आणि ते पाकिस्तान झिंदाबादचे नारे देत होते. 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , तुगलक रोड पोलीस ठाण्यात एक कॉल आला होता. त्यानंतर काही लोक खान मार्केटमध्ये पाकिस्तान झिंदाबादचे नारे देत असल्याची तक्रार करण्यात आली. तेव्हा दोन पुरुष, तीन महिला बाईकवर बसून पाकिस्तान झिंदाबादचे नारे देत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्याऱ्यांची चौकशी केल्यानंतर, आम्ही इंडिया गेट परिसर पाहण्यासाठी आलो आहोत. आम्ही बाईक भाडयावर घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 'आमच्यात बाईकची शर्यत लागली होती. त्यावेळी आम्ही परस्परांचा वेगवेगळया देशांच्या नावांवरुन पुकार करत होतो.' असं ते म्हणाले. 



शिवाय त्यातील एक जण पाकिस्तानातील असल्यामुळे पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याचं स्पष्टीकरण संबंधित व्यक्तींनी दिलं. या प्रकरणात पोलिसांकडून दोन पुरुष, तीन महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे.