नक्षलींनी घडवून आणला भुसुरूंग स्फोट, सहा जवान शहीद
पोलीस शोध घेत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला
रांची : झारखंडमध्ये नक्षली हल्ल्यात सहा जवान शहीद झालेत. झारखंडच्या गडवा जिल्ह्यात भूसुरूंगाचा स्फोट घडवून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात झारखंड जग्वार दलाचे सहा जवान शहीद झालेत. जिल्ह्यातल्या चिंजो जंगलात नक्षली लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस शोध घेत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. नक्षल्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ६ जवान शहीद झालेत. पोलिसांची आणि नक्षल्यांची चकमक अजून सुरू आहे.
झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील छिंजो भागात मंगळवारी रात्री नक्षलींनी हा भीषण हल्ला केला. गढवाचे पोलीस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सांयकाळी लातेहार आणि गढवा सीमाक्षेत्रात नक्षलवादी लपून बसल्याची सूचना मिळाली होती.. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षा दलासोबत कारवाईला सुरुवात केली. सुरक्षा दलाशी सामना झाल्यावर नक्षलींकडून गोळीबार सुरू करण्यात आला. रस्त्यात लपवल्या गेलेल्या दारुनं भुसुरुंग स्फोट घडवण्यात आले. त्यात झारखंड जगुआरचे सहा जवान शहीद झाले तर काही जण जखमी झालेत.