Corona : सुवर्ण मंदिरातील `हजूरी रागी` निर्मल सिंग यांचा मृत्यू
कोरोनामुळे देशाने गमावला पद्मश्री पुरस्कार विजेता
मुंबई : कोरोनाची देशात आतापर्यंत १९००जणांना लागण झाली आहे. देशात आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना चंदिगडमधील पद्मश्री पुरस्कार विजेत्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.
स्वर्ण मंदिरचे माजी हजूर रागी ज्ञानी निर्मल सिंह यांच गुरूवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्बेत ठिक नव्हती. बुधवारी कोरोनाच्या चाचण्या केल्यानंतर त्या पॉझिटीव्ह निघाल्या. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला.
पंजाबचे विशेष मुख्य सचिव केबीएस सिंधुने आज सकाळी याबाबत माहिती दिली आहे. ज्ञानी निर्मल सिंह सकाळी ४.३० वाजता निधन झालं. हजूरी रागी निर्मल सिंह यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ६२ वर्षीय हजूरी रागी हे काहीच दिवसांपूर्वी परदेशातून परतले होते आणि बुधवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं.
२००९ हजूरी रागी ज्ञानी निर्मल सिंह यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ४०० हून अधिक वाढ झाली आहे.