निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र
निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नवी दिल्ली : देशातल्या ६६ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र पाठवले आहे. यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा हवाला देण्यात आला आहे. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, राजस्थानचे माजी मुख्य सचिव सलाहुद्दीन अहमद, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजिब जंग, पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो आदींचा या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.
भारताचा निवडणूक आयोग हा निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी ओळखला जातो. मात्र आता आयोगाची विश्वासार्हता कधी नव्हे एवढी घटल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. निवडणूक आयोग १२ तारखेपर्यंत या पत्राला उत्तर देईल, अशी माहिती आयोगातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. निवृत्त अधिकाऱ्यांच्या पत्रांमध्ये कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख आहे बघुयात...