भारतातल्या `गब्बरां`चा परदेशाकडे वाढतोय ओढा
भारतातले आर्थिकरित्या `गब्बर` व्यक्ती भारताच्या बाहेर स्थिरस्थावर होण्यास प्राधान्य देत आहेत.
नवी दिल्ली : भारतातले आर्थिकरित्या 'गब्बर' व्यक्ती भारताच्या बाहेर स्थिरस्थावर होण्यास प्राधान्य देत आहेत.
'न्यू वर्ल्ड वेल्थ'च्या अहवालात ही माहिती देण्यात आलीय. २०१७ साली देशातून बाहेर जाणाऱ्या करोडपतींच्या संख्येत तब्बल १६ टक्क्यांची वाढ झालीय. यादरम्यान ७००० हाय नेटवर्थ असणाऱ्या भारतीयांनी आपल्या स्थायी निवासस्थानातही बदल केलाय.
याबाबतीत सर्वात उच्च स्थानावर चीन आहे... तर दुसरा क्रमांक भारताचा लागतोय.
'न्यू वर्ल्ड वेल्थ'नं दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये भारतातील जवळपास ७००० करोडपती व्यक्तींनी परदेशा आपलं निवासस्थान (डोमिसाईल) बनवलंय. २०१६ मध्ये ही संख्या ६००० आणि २०१५ मध्ये ही संख्या ४००० इतकी होती.
जागतिक स्तरावर २०१७ मध्ये १०,००० चीनी करोडपतींनी आपलं डोमिसाईल बदललंय. हीच संख्या तुर्कस्थानात ६०००, ब्रिटनमध्ये ४०००, फ्रान्समध्ये ४००० तर रशियात ३००० आहे. हे सर्व करोडपती दुसऱ्याच देशात स्थिरस्थावर झालेत.
अहवालानुसार, भारतातील करोडपती अमेरिका, संयुक्त अरब अमीरात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झालेत... तर चीनी करोडपती मात्र स्थलांतरासाठी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना प्राधान्य देतात.