पणजी : गोव्यात पणजी आणि वाळपई मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. पणजीत ७० टक्के तर वाळपईत ७९ टक्के मतदान झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीचं वैशिष्ट्ये म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर वगळता अन्य उमेदवारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. कारण बाकीचे सर्व उमेदवार वेगळ्या मतदार संघातील आहेत. पर्रीकर यांनी सकाळीच मतदान करून बंदोबस्ताला फाटा देत शेजारच्या हॉटेल मध्ये नाष्टा केला.


मुख्यमंत्री  पर्रीकर पणजीमधून आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून रिंगणात आहेत. दोन्ही पदांचा विचार करता सरकारची प्रतिष्ठा पणाला लागलीये. दोन्ही मतदारसंघात मिळून ५१ हजार मतदार आहेत. 


पणजी मतदारसंघात एकूण चार उमेदवार असले तरी मुख्य लढत भाजपचे उमेदवार पर्रीकर आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्यात होणार आहे. वाळपईतही एकूण ३ उमेदवार असले तरी भाजपचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि काँग्रेसचे उमेदवार रॉय नाईक यांच्यात सामना आहे.