नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) वाईट बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना बोनस (Bonus) आणि डीएची (Da) गूडन्यूज दिली. या दरम्यान सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवा आदेश जारी केला आहे. कर्मचारी आणि प्रशिक्षण मंत्रालयाने (Ministry of Personnel and Training) एक किंवा त्यापेक्षा जास्त गुन्ह्यांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण दिलंय. या नियमाची अंमलबजावणी 7 वा वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. (7th pay commission big change in salary rules government issued order)


सरकारकडून आदेश जारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

DoPT ने ऑफिस मेमोरँडम जारी केलंय.  दंडाची पहिली कारवाई सुरू असताना दुसरी कारवाईही केली जाऊ शकते. म्हणजेच एकाच वेळी दोन दंडात्मक होण्याची शक्यता आहे. शिक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात स्पष्टपणे लिहावे की, एका कर्मचाऱ्याला एकाच वेळी 2 दंड ठोठावण्यात येत आहेत तसेच दोन्ही शिक्षा एकाच वेळी चालतील, असं विभागाकडून सांगण्यात आलंय. 


नियम काय सांगतो?


जर प्राधिकरणाने आपल्या आदेशात हे स्पष्टपणे नमूद केलं नसल्यास दोन्ही शिक्षा एकत्र लागू होतील. तसेच त्या दोन्ही शिक्षा एकाच वेळी चालतील. या नियमानुसार, त्यानंतरच्या आदेशात भरघोस दंड आकारला जात असेल, तर त्या आधीच्या आदेशापेक्षा तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. तसेच मुदत संपल्यानंतर आधीच्या आदेशाचा कालावधी शिल्लक राहिल्यास ते ही पूर्ण केलं जाईल. डीओपीटीने सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.