नवी दिल्ली :  सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) एक घोषणा केली आहे. या घोषणेचा फायदा हा देशातील सुमारे 47 लाख 68 हजार केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार पेन्शनधारकांना मिळणार आहे. सरकारने डीएमध्ये वाढ (DA Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. या डीएचं वाढीचा लाभ हा जानेवारी 2022 पासून देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. तसेच थकबाकीही मिळणार आहे. (7th pay commission big news for central employees announcement of finance ministry over to da)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात अर्थ मंत्रालयाने एक घोषणा केली आहे. यापूर्वी, केंद्राने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली होती.. त्यामुळे  31 टक्क्यावरुन 34 टक्के इतकी वाढ आधीच झाली होती. मात्र आता अर्थ मंत्रालयाने जानेवारी 2022 पासून वाढीव महागाई भत्ता लागू करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच आता थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे.


असा मिळणार वाढीव डीएचा लाभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढीची घोषणा केली होती. यानंतर डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ पगाराच्या आधारे मोजला जातो.