7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचारी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, त्यासाठी त्यांना आता जास्त काळ प्रतीक्षा करवी लागणार आहे. देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यासांठी मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची (डीए वाढ) तारीख निश्चित झाली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस त्याची घोषणा होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार? हे एआयसीपीआय इंडेक्सच्या जानेवारी ते जून 2024 च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. 7व्या वेतन आयोगांतर्गत पगार काढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50 टक्के असेल. जून महिन्यात AICPI निर्देशांकात 1.5 अंकांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई भत्त्याचा आकडादेखील वाढल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासा मानला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जानेवारी ते जून 2024 दरम्यान आलेल्या AICPI-IW निर्देशांकाच्या आकड्यांवरून असे ठरले आहे की जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ मिळेल. जूनच्या एआयसीपीआय निर्देशांकात १.५ अंकांची उसळी दिसून आली आहे. मे महिन्यात ते 139.9 अंकांवर होते, जे आता 141.4 पर्यंत वाढले आहे. महागाई भत्त्याचा स्कोअर 53.36 झाला आहे. याचा अर्थ या वेळी महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार आहे. जानेवारीमध्ये, निर्देशांक क्रमांक 138.9 अंकांवर होता, ज्यामुळे महागाई भत्ता 50.84 टक्क्यांवर पोहोचला.


सप्टेंबरमध्येच महागाई भत्ता जाहीर होणार 


महागाई भत्ता कधी जाहीर होणार? याची वाट केंद्रीय कर्मचारी पाहत होते. पण त्यांना यासंदर्भात कोणतीच अपडेट दिली जात नव्हती. अखेर आता मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर होणार आहे. असे असले तरी त्याची अंमलबजावणी जुलै 2024 पासूनच होणार आहे. मधल्या काही महिन्यांची देयके थकबाकीत असतील. 


53 टक्के महागाई भत्ता


7 व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 53 टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे. 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते. बैठकीच्या अजेंडामध्ये याचा समावेश करण्यात आला असून फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


३ महिन्यांची थकबाकी दिली जाणार 


केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासोबतच थकबाकीसंदर्भातही अपडेट देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस महागाई भत्ता जाहीर केला जाईल. असे असले तरी तो कर्मचाऱ्यांच्या हातात ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळू शकतो. कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही ३ महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. ही थकबाकी मागील महागाई भत्ता आणि नवीन महागाई भत्ता यातील फरक असेल. आतापर्यंत 50 टक्के डीए आणि डीआर दिला जायचा. आता तो 53 टक्के असेल. त्यामुळे 3 टक्के थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाईल. यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा समावेश असेल.


महागाई भत्ता शून्य होणार नाही


कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य म्हणजेच शून्य (0) असणार नाही. महागाई भत्त्याची गणना (DA Hike calculation) चालू राहील. याबाबत कोणताही निश्चित नियम नाही. शेवटच्या वेळी असे केले होते जेव्हा बेस इयर बदलले होते. आता बेस इयर बदलण्याची गरज नाही आणि तशी शिफारसही नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुढील गणना केवळ 50 टक्क्यांच्या पुढे असेल.