केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पण जाणून घ्या NPS किंवा OPS निवडण्याच्या अटी
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाच्या नियमांबाबत महत्वाची बातमी आहे.
मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाच्या नियमांबाबत (7th Pay Commission Latest News Today) महत्वाची बातमी आहे. CCS (Implementation of NPS) Rules, 2021 च्या नियम 10 नुसार, नेशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यू स्थितीत जुनी पेन्शन योजना (OPS) किंवा एनपीएसनुसार (NPS) जमा पेन्शन कॉपर्समधून फायदा निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. (7th Pay Commission update on pension to central employees know what are the conditions for choosing NPS or OPS)
पण मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या पर्यायाचा वापर करु शकत नाहीत. जर स्वत: कर्मचाऱ्याने त्या पर्यायाचा स्वीकार केला नसेल, तर सर्व्हिसआधी 15 वर्षांसाठी जुन्हा पेन्शन योजनेनुसार आपोआप लाभ मिळेल. यानंतर त्या कर्मचाऱ्याला डिफॉल्ट एनपीएसचा पर्याय उपलब्ध असेल. सध्या जुन्या पेन्शन योजनेचा डिफॉल्ट पर्याय नियमांनुसार मार्च 2024 पर्यंत लागू आहे. कर्मचाऱ्याने 15 वर्ष सर्व्हिस केली असेल तरी याचा परिणाम यावर होणार नाही.
सीसीएस (Implementation of NPS) नियम, 2021 30 मार्च 2021 च्याअधिसूचनेद्वारे सूचित करण्यात आले आहे. सीसीएस (एनपीएसची अंमलबजावणी) नियम 2020 च्या नियम 10 नुसार, “एनपीएस अंतर्गत येणारा प्रत्येक सरकारी कर्मचारी, सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर, एनपीएस अंतर्गत लाभ घेण्यासाठी फॉर्म 1 मध्ये एक पर्याय वापरेल. तसेच नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1972 केंद्रीय नागरी सेवा (असाधारण पेन्शन) नियम, 1939 नुसार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा इतर अन्य कारणांमुळे सेवानिवृत्तीच्या काळात लाभ घेता येईल.
या नियमानुसार आधीच सरकारी सेवेत असलेले आणि एनपीएसच्या कक्षेत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही फॉर्म 2 मध्ये लवकरात लवकर असा पर्याय वापरावा लागेल.
9 जून 2021 रोजी झालेल्या कार्यालयीन पत्रात आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) यांनी नमूद केले आहे, त्यानुसार जे कर्मचारी आधीच सरकारी सेवेत आहेत आणि एनपीएस अंतर्गत आहेत त्यांनादेखील फॉर्म 2 मध्ये कौटुंबिक तपशील द्यावा लागणार आहे. सरकारकडे याची नोंद ठेवणं आवश्यक आहे. डीजीएचएसने सर्व अधिकाऱ्यांना 11 जूनपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात यााबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.
सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम 1972 च्या अंतर्गत कौटुंबिक पेन्शन, सरकारी कर्मचाऱ्याने किंवा डीफॉल्टनुसार वापरलेल्या पर्यायानुसार किंवा जर सरकारी कर्मचार्याने एनपीएस अंतर्गत पर्याय निवडला असेल, तर कर्मचाऱ्याच्या कुटुंबास एनपीएस अंतर्गत जमा झालेल्या पेन्शनचा लाभ मिळेल.
डेथ ग्रॅच्युटी
लीव इनकॅशमेंट
CGEGIS चे लाभ
CGHS च्या सुविधा सुविधाएं
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन
संबंधित बातम्या :
बँकेत डिजिटल बचत अकाऊंट उघडतायत, या ३ गोष्टी जाणून घ्या, नुकसान टाळा...
ज्यांनी घर भाड्याने दिले आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आता टॅक्समध्ये अशी सूट मिळवा