बँकेत डिजिटल बचत अकाऊंट उघडतायत, या ३ गोष्टी जाणून घ्या, नुकसान टाळा...

NiyoX च्या आकडेवारीत असेही नमूद केले आहे की, 55 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, ते बँकांकडून वेगवेगळ्या ऑफरच्या आधारे आपले खाते उघडू शकतात.

Updated: Jun 18, 2021, 04:41 PM IST
बँकेत डिजिटल बचत अकाऊंट उघडतायत, या ३ गोष्टी जाणून घ्या, नुकसान टाळा... title=

मुंबई : कोरोनाच्या माहामारीमुळे भारतीय बँकिंग उद्योगात बरेच बदल झाले आहेत. लॉकडाऊन सारख्या निर्बंधानंतर गरज म्हणून आणि गर्दी टाळण्यासाठी डिजिटल बचत खाते उघडण्याची आवश्यकता वाढली आहे. यामुळे विविध डिजिटल बँकिंग आणि मोबाइल बँकिंग स्टार्टअप्स वेगवेगळ्या योजना ऑफर करत आहेत. NiyoX ने केलेल्या देशव्यापी सर्वेमध्ये असे दिसून आले आहे की, 70 टक्के भारतीय आता डिजिटल बँकांकडे वळत आहेत आणि हे सोईस्कर असल्याने ग्राहक त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत आहेत. परंतु तुम्हाला हे डिजीटल खाते उघडण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.

NiyoX च्या आकडेवारीत असेही नमूद केले आहे की, 55 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, ते बँकांकडून वेगवेगळ्या ऑफरच्या आधारे आपले खाते उघडू शकतात. तर 45 टक्के लोकं चांगल्या व्याजदरासाठी बँकांबदलू शकतात. हा सर्वे मेट्रो आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या सुमारे 8 हजार लोकांवर केला गेला आहे.

चांगल्या व्याजदरांचा फायदा

NiyoX चे बिझनेस हेड, तुषार वर्मा यांच्या मते, डिजिटल खाते उघडताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बँकेचा व्याज दर. म्हणूनच, खाते उघडताना तुम्ही पाहूण घ्या की, कोणती बँक तुम्हाला सर्वाधिक व्याज देत आहात. ते म्हणाले "लोकं नेहमीच त्यांच्या बचत खात्यात काही पैसे जमा करतात. परंतु वाढत्या चलनवाढीच्या दराप्रमाणे वर्षानुवर्षे जमा झालेला पैसा वाढत नाही." त्यामुळे व्याजदर नक्की पाहा.

शुल्काकडे लक्ष द्या

भारतातील बहुतेक बँकेतील खातेदारांना खात्यात किमान शिल्लक ठेवण्यास सांगितले जाते. जर ही रक्कम पुरेशी नसेल तर, बँका दंड आकारतात. या व्यतिरिक्त शिल्लक देखभाल शुल्क, एसएमएस शुल्क, एटीएम कार्ड शुल्क, परत केलेला चेक शुल्क, असे अनेक शुल्क आकारले जातात. अशा परिस्थितीत, डिजिटल खाते उघडताना फी चार्ट तपासा. म्हणजे सर्वात कमी शुल्का आकारणारी बँक तपासा आणि खाते खोला.

चांगल्या सुविधा देणाऱ्या सर्वोत्तम संस्था निवडा

बरेच डिजिटल बचत खाती एक उत्कृष्ट UIआणि UX चा अनुभव देतात. तर काही वित्तीय संस्था 24 ×7 ग्राहक सहाय्यता, खर्चाचा ट्रॅकर, विविध क्रियांवर मर्यादा ठरविण्याचा पर्याय - यूपीआय, पीओएस, ऑनलाइन, लॉक आणि अ‍ॅपद्वारे डेबिट कार्ड अनलॉक इ. सुविधा उप्लब्ध करुन देतात.

याशिवाय बँकांकडून वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात. म्हणूनच, डिजिटल खाते उघडताना, अशी एखादी संस्था निवडा जिथे तुम्हाला बर्‍याच सुविधा मिळतील.