Electric Scooter चार्ज करताना 8 जणांचा मृत्यू, तुमच्याकडून होतेय अशी चूक?
Electric Scooter चार्ज करताना तुम्ही अशी चूक करत असाल तर सावधान, `या`ठिकाणी 8 जणांचा मृत्यू
हैद्राबाद : तेलंगणामधील (Telangana) सिकंदराबादमध्ये सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. ज्यामुळे 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सिकंदराबाद येथील इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमला आग लागली. इलेक्ट्रिक बाईक (Electric Scooter) चार्ज होत असताना ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. (Eight people died)
डीसीपी चंदना दीप्ती म्हणाल्या, "आधी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, पण गुदमरल्यामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या तपासात शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, शोरुमच्या वरच्या मजल्यावर लॉज आहे. आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले. इमारतीतून बाहेर पडण्यासाठी लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अनेकांची सुटका केली.
यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या पाच नवीन स्कूटर आणि 12 जुन्या स्कूटर जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त (Prime Minister Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याने मला दु:ख झालं. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमी लवकर बरे होवोत.. अशी प्रर्थना मोदी यांनी केली आहे.
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ( PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. .