श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये ८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. अनंतनाग आणि शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.



जिवंत दहशतवाद्याला पकडलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलंय. जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी असल्याचं सांगण्यात येतंय. अनंतनागमध्ये कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव रुफ खांडे असं असून तो कोकरनाग इथला राहणारा आहे. तर जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव इमरान रशीद असं आहे.



सर्च ऑपरेशन सुरु


अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागमध्ये शोध मोहीम सुरू केली. 



दरम्यान या परिसरात लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.