Gen Z Employee : गेल्या बऱ्याच काळापासून आताची तरुण पिढी किंवा मग Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरी मिळत नाही किंवा ते आळशी आहेत अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यांच्यात क्रिएटिव्हीटी असली तरी ते जास्त वेळ थांबून किंवा डेडिकेशनं काम करतील का असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. या सगळ्यात आता अशी एक माहिती समोर आली आहे ज्यानं सगळ्यांना नक्कीच आश्चर्य होईल. नुकताच एक सर्वे करण्यात आला त्यातून एक माहिती समोर आली आहे की 80 टक्के Gen Z कर्मचाऱ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी गरजेच्या असलेल्या स्किल्स शिकण्याला महत्त्व देतात. तर या सगळ्यात त्यांचं प्राधान्य त्यांचा पगार नसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

apna.co या वेबसाईटनं हा सर्वे केला. या सर्वेंत त्यांनी 10,000 Gen Z  कर्मचाऱ्यांवर हा सर्वे केला. यात करिअरीविषयी काय आशा किंवा आकांक्षा आहेत, त्यानंतर कामाच्या ठिकाणीची ते निवड कशी करतात आणि त्यात कसे मोठे होऊ शकतात या सगळ्या गोष्टींवर हा सर्वे होता. यावेळी ही गोष्ट लक्षात आली की Gen Z  कर्मचारी हे स्ट्रॅटर्जिक आहेत. इतकंच नाही तर त्यांना थोड्याच काळात यशस्वी होण्यापेक्षा मेहनत करत काही काळानंतर यशस्वी झालं तरी चालेल अशी विचारसरणीचे आहेत. त्यांना करिअरमध्ये अर्थपूर्ण यश हवं आहे, ज्याचा त्यांच्या करिअरला फायदा होईल. 


त्यासोबत आणखी एक माहिती समोर आली की Gen Z कर्मचारी हे चांगल्या कामाच्या इथे असणारं वातावरण हे महत्त्वाचं आहे. त्यात 74 टक्के Gen Z कर्मचाऱ्यांचं हेच मत होतं. त्यासोबत तिथे मिळणारा आदर, कोलॅबरेशन आणि ओळख ही महत्त्वाची आहे. 


दरम्यान, आधीची पिढी किंवा मग Millennials यांच्यासाठी मार्गदर्शन हे इतकं महत्त्वाचं नव्हतं असं म्हटलं जातं, तर त्यांच्या विरुद्ध हे Gen Z आहेत. त्यांना त्यांच्या कामाची पावती, त्यात काही बदल हवे आहेत, आणखी काय चांगलं करु शकतो हे जाणून घेण्याची इच्छा जास्त असते. त्यांना अशा ठिकाणी काम करायला आवडतं जिथे त्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील नाकी तेच ते काम करावं लागेल. याशिवाय त्या कामामुळे त्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम होणार नाही ना याची देखील ते तितकीच काळजी घेतात. त्यांना सतत काही ना काही नवीन आयड्या या शेअर करायला आवडतात. त्यासोबत टीमवर्क करण्याला ते जास्त महत्त्व देतात. 


हेही वाचा : बाईकची टाकी नेहमी फूल ठेवल्याने मिळतो जबरदस्त मायलेज? उत्तर ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य


Gen Z यांना हायब्रिड वर्कप्लेस असेल अशा ठिकाणी काम करायला पसंती देतात. तर 68 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन काम करायला जास्त आवडतं. हायब्रिड वर्कप्लेस म्हणजे त्यांना त्या कंपनीसोबत काम करत असताना त्यांना हवं तेव्हा ते दुसरं काम करु शकतात.