Old Lady Walks 8 Km Video: रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावाबहिणींचे प्रेम आपल्याला पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावरही भावाबहिणींचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यांचे भावूक नाते पाहून सर्वांनाच आनंद होतो. आपल्याला आपल्या बहीण-भावाची आठवण येते. त्यामुळे असे भावा-बहिणीचे व्हिडीओ हे आपल्या मनाला आनंद देऊन जातात. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक आजीबाई चक्क बराच मोठा प्रवास करून आल्या असल्याचे दिसते आहे. परंतु नक्की त्यांनी हा प्रवास का केला आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया. वयोवृद्ध लोकांचा स्टॅमिना पाहून आपल्यालाही फारही प्रेरित झाल्यासारखे वाटते. त्यातून सध्या या 80 वर्षीय आजीबाईंनी खासकरून आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी चक्क बऱ्याच किलोमीटरचा प्रवास केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे या आजीबाईंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. वर्षातून एकदाच येणारा रक्षाबंधन हा सोहळा हा प्रत्येक भावा-बहीणींसाठी हा फारच खास असतो. यावेळी भावाला बहीण राखी बांधते आणि सोबतच भाऊ आपल्या बहीणीचे रक्षण करण्याचे वजन घेतो. यावेळी पारंपारिक पद्धतीनं बहीण ही भावाला ओवाळते आणि भाऊ तिला ओवाळणी देतो. त्यामुळे प्रत्येकासाठी हा दिवस फारच खास असतो. परंतु आपल्या भावासाठी एक बहीण ही चक्क पायी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येते हे काही नवीन नाही. अशा बातम्या तुम्ही याआधीही एकल्या आणि पाहिल्या असतील. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की या आजीबाई नक्की कुठल्या आहेत आणि त्यांनी हा प्रवास नक्की कुठून कुठपर्यंत केला आहे. 


हेही वाचा : गेली 40 वर्ष एकही पुरस्कार न मिळवलेले अनिल शर्मा Gadar 2 ऑस्करला नेणार? पाहा काय म्हणाले...


समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, या महिलेचे नावं आहे सत्तामा अथवा सत्यवती. त्या 8 किलोमीटर चालत तेही तळपत्या उन्हात आपल्या भावासाठी, त्याला राखी बांधण्यासाठी त्याच्या भावाच्या घरी म्हणजे तेलंगणामध्ये पोहचली आहे. एका ट्विटरच्या युझरनं एक ट्विट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यात तो म्हणतो की, जिथे कुठेही ट्रान्सपोर्टची सुविधा नाही अशी 80 वर्षीय महिला ही एकटी चालत भावाच्या घरी रक्षाबंधनासाठी पोहचली आहे. एका तरूण पुरूषानं तिला पाहिले आणि तिला विचारले की ती एकटी कुठे जाते आहे तेव्हा तिनं उत्तर दिले की तिच्या भावाला भेटायला जाते आहे. 



या वयस्कर महिला या एकट्यानं प्रवास करत होत्या. त्यातून त्यांच्या हातात एक पोटली होती. त्यांच्या अंगावर फार थोडेच अलंकार होते आणि त्यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.