Crime News In Marathi: त्रिपुराची राजधानी अगरतला येथेन एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक मिला तिच्या मुलाच्या मृतदेहासह आठ दिवसांपासून राहत होती. शेजाऱ्यांना जेव्हा घरातून दुर्गंधी आली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घरातील अवस्था आणि मृतदेह पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना या घटनेबाबत कळाल्यानंतर ते लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला.  या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महारागंग बाजार पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी मृणाल पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिव नगर परिसरातील एका घरातून दुर्गंधी येण्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिस आत गेले असता घरातच पलंगावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. तर घरातच बाजूच्याच खोलीत मृत व्यक्तीची आई होती. 


काय घडलं नेमकं?


पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या चौकशीवरुन लक्षात आले की, कौटुंबिक वादातून मृत व्यक्तीची पत्नी घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर 54 वर्षांचा व्यक्ती त्याची आई कल्याणी सूर चौधरी यांच्यासोबत राहत होता. कल्याणी या दीर्घकाळापासून आजारी होता. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याने त्या बाजूच्या खोलीत होत्या. त्यामुळंच मुलाचा मृत्यू झाला असल्याचे त्यांना कळले नाही. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही गंभीर जखमा आढळून आल्या माहीत. वैवाहिक वाद आणि मानसिकरित्या अस्थिर असल्याने तो सतत दारू पित असायचा आणि त्याचमुळं त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण ज्या खोलीत व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. तिथे दारूच्या बॉटल सापडल्या होत्या. त्यामुळं पोलिसांनी हा अंदाज वर्तवला होता. 


आई पॅरेलिसीस झाल्यामुळं अंथरुणाला खिळून होती. त्यामुळं मुलाचा मृत्यू झाल्याचे तिला कळलेच नाही. जवळपास 8 दिवस ती मुलाच्या मृतदेहासोबतच राहत होती. अखेर शेजाऱ्यांना दुर्गंधी यायला लागल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतदेह शवविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.