महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींनी व्हिडिओ केला सोशल मीडियात पोस्ट
राजस्थानमधील सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारा कायदा मंजूर केला. हा कायदा मंजूर झाल्यानंतर एका दिवसातच एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : राजस्थानमधील सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारा कायदा मंजूर केला. हा कायदा मंजूर झाल्यानंतर एका दिवसातच एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
व्हिडिओ केला व्हायरल
एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपीने व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केल्याचीही माहिती समोर आली आहे.
व्हिडिओ समोर येताच तक्रार दाखल
बारां जिल्ह्यात सहा तरुणांनी ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि व्हिडिओही तयार केला. आरोपींनी हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला. पीडित महिलेला व्हिडिओ संदर्भात समजल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत कुठल्याच आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये.
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने केला बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कोटा येथील एका ढाब्यावर काम करते. पाच मार्च रोजी सहा युवकांविरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत पीडित महिलेने म्हटलं आहे की, सासरी जाण्यासाठी निघाली असताना आरोपी चेतन मीणाने बाईकवरुन सासरी सोडण्यासाठी लिफ्ट दिली आणि त्याच दरम्यान अज्ञातस्थळी नेत बलात्कार केला.