Viral News : एका रात्रीत स्टार झाल्याच्या अथवा सामान्य व्यक्तीला लॉटरी लागल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या देखील असतील. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एक भीक मागणारा (beggar boy) मुलगा रातोरात लखपती बनलाय. हे खरंच शक्य आहे का? असा साहजिक प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण होय ही खरीच घटना आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक 11 वर्षाचा मुलगा (beggar boy) दररोज रस्त्यावर भीक मागायचा. दररोज मिळणाऱ्या या भीकेच्या पैशातून तो आपलं पोट भरायचा. एके दिवशी रस्त्यावर अशीच भीक मागत असताना, एका व्यक्तीची त्याच्यावर नजर पडली. हा व्यक्ती त्याच्या आयुष्याचा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. नेमका हा कसा टर्निंग पॉईंट होता, हे वाचूयात.


आई-वडिलांच छत्र हरपलं


पंडोली गावात मुलाची आई (Boy Mother) राहत होती. तिचे नाव इम्राना होते. 2019 ला इम्रानाने रागाच्या भरात सासरचे घर सोडले होते. इम्रानाला पुन्हा सासरी घेऊन येण्यासाठी तिच्या पतीने अनेकदा प्रयत्न केले होते. मात्र ती मानली नाही. नंतर इम्राना आपल्या मुलाला घेऊन उतराखंडच्या (Uttarakhand) कालियार येथे आली होती. या दरम्यान सासरच्यांनी इम्रानाचा खुप शोध घेतला, मात्र तिचा काही शोध लागला नाही. त्यामुळे इम्राना आणि मुलापासून विभक्त झालेल्या पतीचा मृत्यू झाला. काही दिवसांनी कोरोनाची महामारी आणि यादरम्यान इमरानाचाही मृत्यू झाला. या घटनेने इम्रानाचा मुलगा साहजेब अनाथ झाला. 


ओळख पटली अन् लॉटरी लागली 


मुलाचे वडिल वारले असले तरी आजोबांनी आपल्या नातवाचा शोध सुरुच ठेवला होता.आजोबांनी आपल्या नातवाला शोधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. नातवाचे फोटो वर्तमानपत्रांपासून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केले. या फोटोतील चिमुकला एका मोबिन नावाच्या नातेवाईकाला दिसला.त्यांनी त्याचा फोटो व्हॉट्सअॅपवरून पाठवून त्याची ओळख पटवून घेतली.त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली आणि मुलाला नातेवाईकांकडे सुपुर्द केला. 


असा झाला लखपती


खरं तर मुलाच्या आजोबांनी त्याची अर्धी मालमत्ता नातवाच्या नावावर केली होती. त्यामुळे ते नातवाचा शोध घेत होते. अखेर त्यांना त्याचा नातू सापडलाय. त्यामुळे चिमुकला त्याच्या वडिलांच्या घरी गेल्यावर लखपती झाला आहे. त्याच्या वडिलांचे घर गावात होते, ज्याची किंमत सुमारे 20 ते 25 लाख रुपये होती. याशिवाय मुलाच्या नावावर 7.50 गुठ्ठे जमीन असून त्याची एकूण मालमत्ता 50 लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. हि संपुर्ण जमीन त्या मुलाच्या नावावर होती. त्यामुळे चिमुकला भिकारी रातोरात लखपती बनला आहे.  


दरम्यान हा मुलगा त्याच्या आजोबांना सापडल्याने त्याचे नशीब फळफळलंय. तसेच त्याचे भविष्य देखील उज्वल होण्याची शक्यता आहे.