Viral News: आपण अनेकदा WhatsApp वर एखादा मेसेज ज्याला पाठवायचा आहे त्याच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला पाठवतो. माणूस म्हटला तर चूक होणं अपेक्षित असल्याने त्यात इतकं काही आश्चर्याचं नाही. पण अनेक वेळा हा मेसेज अशा ठिकाणी जातो ज्यांना ती गोष्ट आपण सांगितलेलीच नसते. यानंतर होणारी फजिती ही फार लाजिरवाणी असते. नुकतंच एका तरुणाला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. कारण त्याने कुटुंबाने पाहू नये असा मेसेज कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला. यानंतर त्याच्या बहिणीने त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला, पण त्याचा फायदा झाला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणाने WhatsApp ला आपल्या फॅमिली ग्रुपवर चुकून असा फोटो टाकला जो पाहून त्याच्या आई-वडिलांना धक्काच बसला. यानंतर त्याच्या बहिणीने त्याला लगेच पर्सनलवर मेसेज करुन तो फोटो डिलीट करण्यास सांगितलं. पण तो हा फोटो डिलीट करु शकला नाही. त्याने सांगितलेलं कारण ऐकून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्या. बहिण-भावाचं हे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यावर नेटकरीही व्यक्त होत आहेत. 


ट्विटरला सानिया धवन नावाच्या एका युजरने व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की "माझ्या भावाने हे फॅमिली ग्रुपवर पोस्ट केलं होतं". या पोस्टमध्ये तिने भावाने कशाप्रकारे बिअर कॅनचा फोटो फॅमिली ग्रुपवर पोस्ट केला होता हे दाखवलं होतं. या फोटोसहित तिच्या भावाने लिहिलं होतं की, "मुंबई इंडियन्स फॉर द विन....लेट्स गो".


बिअऱचा फोटो पाहिल्यानंतर त्यांचे वडील यांचा मेसेज दिसत आहे. काय? अशी विचारणा ते करत आहेत. तर त्यांची आई, तू बिअर पितोस का? असं विचारतात. यानंतर ग्रुपवर शांतता पसरते. कोणीही काहीच मेसेज करत नाही. यादरम्यान सानिया आपल्या भावाला पर्सनलला मेसेज करुन तो बिअरचा फोटो डिलीट करण्यास सांगते. त्यावर तिचा भाऊ सांगतो की, यार मी Delete For Everyone च्या जागी Delete For Me केलं आहे. दोघांमधील हे चॅट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. 



सानियाने पोस्ट केल्यानंतर ट्वीटरला 13 लाखांहून अधिक लोकांनी हे ट्वीट पाहिलं आहे. तसंच अनेकांनी कमेंट करत आता त्या मुलाची काय हालत झाली असेल याचे अंदाज लावले आहेत. मुलाला आता काहीतरी गोष्ट रचावी लागेल असं काहींनी मनोरंजक पद्धतीने म्हटलं आहे.