हॉटेलमध्ये थांबलं होतं कपल, चेकआऊट टाइम झाल्यानंतरही बाहेर येईनात, मॅनेजरने खिडकीतून वाकून पाहिलं तर...
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात R-Star हॉटेलच्या रुममद्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुणाने गळफास घेतला होता, तर तरुणीचा मृतदेह बेडवर बेशुद्धावस्थेत होता. पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे.
उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात R-Star हॉटेलच्या रुममध्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुण गळफास घेतल्याने लटकलेल्या अवस्थेत होता, तर तरुणीचा मृतदेह बेडवर पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच एसपी, एडिशनल एसपी, कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी करत पुरावे जमा केले आहेत. यानंतर तरुण-तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील गौतमनगर परिसरात राहणारा 20 वर्षीय तरुण आणि संभलमधील 23 वर्षीय तरुणी गुरुवारी दुपारी सदर कोतवाली परिरातील R-Star हॉटेलमध्ये पोहोचले होते. हॉटेल मॅनेजरने दोघांचं ओळखपत्र तपासल्यानंतर त्यांना रुम दिली होती.
रात्री उशिरापर्यंत रुममधून आले नाहीत बाहेर
रात्री 11 वाजता त्यांचं चेकआऊट होणार होतं. वेळमर्यादा संपल्यानंतर हॉटेल मॅनेजरने दरवाजा ठोठावला. पण आतून कोणीही उत्तर दिलं नाही. यामुळे मॅनेजरला शंका आली. त्याने शिडी लावून खि़डकीतून डोकावून पाहिलं असता तरुणाने गळफास घेतला होता आणि तरुणी बेडवर बेशुद्ध पडली होती.
घाबरलेल्या मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर सदर कोतवाली पोलीस आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीशचंद्र घटनास्थळी दाखल झाले. हॉटेल मॅनेजरकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली. तरुण आणि तरुणीचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर एसपी कुलदीप सिंह गुनावत फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी दाखल झाले.
मृतांच्या ओळखपत्राच्या आधारे नातेवाईकांना माहिती देण्यात आली. तसंच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तरुणाने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. तसंच तरुणीच्या तोंडातून फेस येत असल्याने तिने विषारी पदार्थाचं सेवन केल्याचं दिसत आहे. पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे.
एसपी कुलदीप सिंह गुनावत यांनी सांगितलं आहे की, प्राथमिक तपासात दोघांनी आत्महत्या केल्याचं दिसत आहे. सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, तपास सुरु आहे. मृतांच्या कुटुबीयांना माहिती देण्यात आली आहे.