Viral Video : मनोकामना पूर्ण होण्यासाठी भक्त देवाला साकडं घालतात. वेगवेळे नवत करतात. मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर हे भक्त तितक्याच मनोभावे नवस फेडतात देखील.  देवाचा नवस फेडायला गेलेल्या एका भक्ताला भयानक अनुभव आला आहे. नवस फेडायला गेलेला भक्त हत्तीच्या पोटाखाली अडकला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल(Viral Video) होत आहे. गुजरातमधील एका मंदिरातील(temple in Gujarat) हा व्हिडिओ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

@chumururi नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखापेक्षा जास्त युजर्सनी पाहिला आहे. अनेकांनी याला रिट्विट केलं आहे तर या वर कमेंट्सचा देखील वर्षाव होत आहे. गुजरातमधील एका मंदिरातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत भक्त देवाचं नवस फेडण्यासाठी लोटांगण घालत मंदिरात आल्याचे दिसत आहे. नवस फेडत असताना हा भक्त मंदिराबाहेर असलेल्या दगडी हत्तीच्या पोटाखाली अडकला आहे. 


हत्तीच्या पोटाखाली अडकेलेला भक्त यातून स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. मंदित परिसरात उपस्थित असलेले नागरिक तसेच मंदिराचा पुजारी देखील या भक्ताच्या मदतीला धावून आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हे सर्व जण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुचना करताना व्हिडिओत दिसत आहे. या भक्ताची हत्तीच्या व्हिडिओखालून सुटका कशी झाली याचा व्हिडिओ अद्याप समोर आलेला नाही.