Madhya Pradesh News : एखाद्या पित्याला स्वतःचं बाळ गमावण्यापेक्षा दुसरा मोठा दुःख काय असू शकतं. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच बाळाचा मृतदेह पिशवीत भरुन घरी नेण्याची वेळ या पित्यावर आलेय. पिशवीतून बाळाचा मृतदेह पिशवीतून घेऊन आलेल्या या पित्याला पाहून ग्रामस्थांना देखील गहिवरुन आले. मध्य प्रदेशात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या पित्यावर बाळाचा मृतदेह पिशवीत भरुन नेण्याची वेळ आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हलाक्याच्या आर्थिक स्थितीमुळे एक पिता हतबल झाला. त्याने अनेक विनवण्या केल्या हात जोडले. मात्र, कुणीच त्याची मदत केली नाही. बाळाचा मृत्यूमुळे हताश झालेल्या पित्याला आणखी एका कठिण प्रसंगाचा सामना करावा लागला. रुग्णवाहिका न मिळाल्याने या पित्याला आपल्या बाळाचा मृतदेह पिशवती भरुन घरी न्यावा लागला. बाळाचा मृतदेह असेलली पिशवी छातीशी कवटाळून हा पिता जड अंतःकरणाने घराची वाट धरली. अश्रुंचा बांध या पित्याने डोळ्यांच्या काठावरच रोखून धरला. मृतदेहाशी पिशवी घेवून आलेल्या या पित्याला पाहून ग्रामस्थांचे डोळे देखील पाणावले.   


नेमकं काय आहे प्रकरण? 


सुनील धुर्वे असे या हतबल पित्याचे नाव आहे. सहजपुरी येथील रहिवासी सुनील धुर्वे यांची पत्नी जमनीबाई यांनी 13 जून रोजी जिल्हा रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. जन्माच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 जून रोजी मुलाची प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी बाळाला जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला सुनील यांना दिला. मात्र, येथे उपचारादरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला. अथक प्रयत्न करुनही मुलाला वाचवता न आल्याने सुनील यांना धक्का बसला. यानंतर त्यांना आणखी एका अत्यंत कठिण प्रसंगाचा सामना करावा लाला. बाळाचा मृतदेह दिंडोरी येथे आणावा लागणार असल्याने त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाकडे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र, प्रशासनाने साफ नकार दिला. मोल मजूरी करुन आपल्या कुटुंबाचा उदर्निर्वाह चालवणाऱ्या सुनील यांच्याकडे  खाजगी वाहन सोडा सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्यासाठी देखील पैसे नव्हते. सुनील यांनी लोकांकडे मदत मागत बसच्या तिकीटासाठी पैसे जमा केले. परिस्थीतीपुढे हरलेल्या सुनीस यांनी शेवटी बाळाचा मृतदेह पिशवीत भरला आणि बस पकडून गाव गाठले.