लग्न आणि प्रेमात अनेकदा जोडीदाराकडून फसवणूक होत असल्याचं तुम्ही वाचलं किंवा पाहिलं असेल. आपली फसवणूक झाल्यानंतर हे जोडीदार बदला घेण्यासाठी सोशल मीडियावरुन व्यथा मांडतात किंवा मग थेट त्यांचं घर गाठत जाब विचारतात. इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे 49 वर्षीय महिला Buathip Kendray ने आपली फसवणूक करणारा प्रियकर Steven Woods सोबत जे काही केलं ते तो आयुष्यभर विसरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोडफोड करत खिडकीतून घऱात घुसली


द लिव्हरपूल इकोच्या रिपोर्टनुसार, 6 ऑगस्ट 2023 रोजी नात्यात फसवणूक होत असल्याचं समजताच संतापलेली कैंड्रे आपला प्रियकर वूड्सच्या घऱी पोहोचली. त्याने कारची काच फोडली. नंतर ती खिडकीतून घरात घुसली. वुड्स आणि त्याच्या नव्या प्रेयसीला जेव्हा कैंड्रे घरात घुसल्याचं समजलं तेव्हा ते बेडरुममध्ये गेले आणि दरवाजा आतून बंद केला. यानंतर ते पोलीस येण्याची वाट पाहू लागले. यादरम्यान ती बेडरुमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होती. 


बेडरुममधून केला पोलिसांना फोन


सरकारी वकील डेरेक जोन्स यांनी 5 जानेवारीला लिव्हरपूल क्राउन कोर्टात सांगितलं की, कैंड्री आरडाओरडा करत, तोडफोड करत वुड्सच्या घरात घुसली होती. वुड्स आणि त्याची प्रेयसी इतके घाबरले होते की, त्यांनी खोलीत स्वत:ला कोंडून घेत पोलिसांना फोन केला. कैंड्री मार्शल आर्ट स्टिकच्या मदतीने बेडरुमममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी घाबरलेल्या वुड्सने केलेल्या फोननंतर पोलीस पोहोचले. 


जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा वुड्स खोलीतून मदतीसाठी आरडाओरड करत होता. त्यांनी तात्काळ घऱात उपस्थित कैंड्रेला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


कैंड्रेच्या वकिलांनी तिची बाजू मांडताना सांगितलं की, ती एक 49 वर्षीय महिला आहे जिच्यावर कोणताही गुन्हा नाही. ती घराबाहेर जास्त पडत नाही. ही तिच्या आयुष्यातील पहिलीच चूक होती. कैंड्री त्या घऱात वुड्ससोबत राहिली असल्याने ती त्याला आपलंही घर मानते. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. यानंतर वुड्सने तिला घऱाबाहेर काढलं होतं. या ब्रेकअपमुळे ती तणावात होती. याचदरम्यान तिला वुड्सच्या नव्या प्रेयसीसंबंधी माहिती मिळाली असता ती संतापली होती.