उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात कुठौंद येथे एका बकरीने दोन बाळांना जन्म दिला असता त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण या कोकरुंचा चेहरा अगदी माणसाच्या बाळाप्रमाणे होता. त्यांच्या शरिरावर अजिबात केस नव्हते. कोकरुंचे हात-पाय बकरीसारखेच होते. पण चेहरा मात्र एखाद्या माणसाच्या बाळासारखाच दिसत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बकरीने माणसासारखा चेहरा असणाऱ्या दोन कोकरुंना जन्म दिल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर त्यांनी पाहण्यासाठी गावातील लोकांनी तुफान गर्दी केली. पशुपालन करणाऱ्या कमलेश दोहरे यांच्या मालकीची ही बकरी आहे. मंगळवारी तिने दोन बाळांना जन्म दिला होता. हे कोकरु प्रसूतीकाळ पूर्ण होण्याआधीच जन्माला आल्याचं दिसत होतं. 


कोकरुंच्या चेहऱ्याचा आकार हा अगदी माणसाच्या बाळाच्या चेहऱ्याप्रमाणे वाटत होता. पण त्यांचं इतर शरीर प्राण्याप्रमाणेच होतं. लोकांना ही बातमी कळताच सर्वांसाठी कुतुहूलाचा विषय झाला. यानंतर आसपास आणि दूरच्या गावातील लोक बकरीच्या दोन्ही पिल्लांना पाहण्यासाठी कमलेश यांच्या घरी पोहोचू लागले. दरम्यान हे कोकरु फार अशक्त होते. 


दुर्दैवाने जन्मानंतर फक्त पाच मिनिटांत दोन्ही पिलांचा मृत्यू झाला. पशुवैद्यक यामागे वैज्ञानिक कारण असल्याचं सांगत आहेत. हे अनुवांशिक विकारामुळे होते असं त्यांनी म्हटलं आहे. अनुवंशिक विकारामुळे मुलांच्या शरीरात जास्त प्रमाणात द्रव भरला जातो, ज्यामुळे त्यांची रचना बदलते अशी माहिती त्यांनी दिली आहे.